'आज मी शपथ घेतली. आज मोठी संधी समाजकारणासाठी उपलब्ध होतं असून येणाऱ्या संधीचं सोनं करेल. बाळासाहेब थोरात आजारी आहेत. ते असते तर आनंदच असता. माझा निवडणुकीत प्रचारासाठी फक्त मतदार संघातले तरूण नव्हते. तर कानाकोपऱ्यातले होते. दादांचा सल्यानुसार मी विचारपूर्वकच निर्णय घेईन. अदृश्य शक्तीची नाही तर ज्ञात अज्ञात सर्वांची निवडणुकीत मदत झाली' अशी प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर दिली.