बिग बॅास फेम अभिजित बिचुकले यांना धमकीचा फोन आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कसबा मतदारसंघातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी धमकीचा फोन आल्याची तक्रार बिचुकले यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. दरम्यान, अभिजित बिचुकले आणि लहुजी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली होती. यावेळी बिचुकले यांनी उच्चारलेल्या काही शब्दांमुळे हा वाद निर्माण झाला होता.