Turkey Earthquake: भूकंप होणार हे आधीच माहीत होतं; संशोधकाचं 'ते' ट्विट व्हायरल
७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाने दक्षिण टर्की हादरून गेलं आहे. भूकंपामध्ये ५०० हून अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर अजूनही बचाव कार्य सूरू आहे. मात्र टर्कीमधील भूकंपाचा हा धोका आधीच वर्तवण्यात आला होता. संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी या संदर्भात तीन दिवसांपूर्वीचं केलेल्या ट्विटची सध्या चर्चा रंगलीय.