Pravin Togadia यांची मोदींकडे 'ही' मागणी; शिंदे-फडणवीस सरकारला लगावला टोला
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूरात पत्रकार परिषदे घेत तोगडिया म्हणाले की, अयोध्येत बांधले जाणारे राम मंदिर 50 वर्षांनंतरही पाडले जाऊ शकते. याचे कारण म्हणजे देशाची असतुंलन असलेली लोकसंख्या आहे. यासाठी केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची गरज आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी महाराष्ट्रात हिंदू संघटनांनी काढलेल्या मोर्चावरून तोगडियांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोलाही लगावला.