Pandharpur येथे विठ्ठल मंदिरात रंगला चक्री भजनाचा सोहळा
माघी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चक्री भजन सोहळा पार पडला. चक्री भजनाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. चक्री भजन करून देवाला प्रसन्न केलं जातं, अशी श्रद्धा आहे. औसा येथील औसेकर महाराजांना मंदिरात चक्री भजन करण्याचा मान आहे. गेल्या पाच पिढ्यांपासून त्यांची ही चक्री भजनाची सेवा सुरू आहे