बुलढाणा जिल्ह्यातील येळगाव येथील विष्णू गडाख यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे न धावता शेती करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नव्हे तर आपल्याकडे असलेल्या दोन एकर शेतीपैकी दीड एकरमध्ये पारंपारिक पिकासोबत अर्धा एकर शेतामध्ये विदेशी पालेभाज्यांची लागवड त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी यूट्यूबचा आधार घेतला. आतापर्यंत ब्रोकली, रेड कॅबेज, लेटुस अशा २२ ते २५ प्रकारच्या भाज्यांची लागवड त्यांनी केली आहे.