भाजपा नेत्या पंकजा मुंडे सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. पंकजांनी परळीत राहून अर्थसंकल्प पाहिला, त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. दरम्यान दिवसभरातील आपले दौरे आटपून झाल्यानंतर पंकजांनी परळीतील जिजामाता उद्यानासमोरील शिव पावभाजी सेंटरला भेट देऊन आपल्या कार्यकर्त्यांसह पावभाजी खाण्याचा आनंद घेतला.