Adani FPO: गौतम अदाणींनी सांगितलं FPO गुंडाळण्यामागचं कारण

2023-02-02 0

भारतातील अब्जाधीश आणि अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असणारे अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी कंपनीचा महत्त्वाकांक्षी FPO बाजारातून गुंडाळण्याचा निर्णय गुरुवारी रात्री जाहीर केला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या; अदाणी समूहाच्या हवाल्याने एक व्हिडीओ एएनआयनं ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये गौतम अदाणी स्वत: या निर्णयाविषयी माहिती देताना दिसत आहेत. या व्हिडीमध्ये अदाणींनी हा निर्णय का घेतला, कुणी घेतला आणि या निर्णयानंतर पुढे अदाणी समूहाची वाटचाल कशी असणार आहे? याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.

Videos similaires