Budget 2023: डिजिटल प्लॅटफॉर्म, स्टार्टअप्सना संधी; Nirmala Sitaraman यांची शेती क्षेत्रासाठी घोषणा
India Budget 2023-24 Live Updates मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज त्यांचा सलग पाचवा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी शेती क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी भरीव तरतूद केली जाईल, असे सांगितले. या आर्थिक वर्षात सरकारकडून कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल, असेही निर्मला सीतारामन म्हणाल्या.#budget2023