Pathaan चित्रपटाने प्रदर्शनानंतर बॅाक्स ऑफिसचे अनेक रेकॅार्ड मोडीत काढले आहेत. हे यश साजरा करण्यासाठी चित्रपटाच्या संपूर्ण टिमची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शाहरूख खान, दीपिका पादुकोण, जॅान अब्राहम, दिग्दर्श सिद्धार्थ आनंद हे उपस्थित होते. प्रेक्षकांचा प्रतिसादा पाहता शाहरूखने पुन्हा एकदा चाहत्यांचे मनापासून आभार मानले. व दिलखुलास गप्पा ही मारल्या.