Pathaan चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता शाहरूख खानचं रुपेरी पडद्यावर जोरदार पुनरागमन झालंय. बॅाक्स ऑफिसवरील कमाई पाहता देशभरातून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. असं असतानाच शाहरूख खानने आपल्या चाहत्यांचं 'पठाण' स्टाईलने आभार मानले आहेत. आपल्या मन्नत बंगल्याबाहेर येत शाहरूखने चाहत्यांना मोठं सरप्राईज दिल्याने चाहत्यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला.