Ravi Rana on MVA: 'जनतेची दिशाभूल करणारा सर्व्हे'; सी वोटर कंपनीच्या सर्वेक्षणावर राणा यांची टीका

2023-01-29 0

Ravi Rana on MVA: 'जनतेची दिशाभूल करणारा सर्व्हे'; सी वोटर कंपनीच्या सर्वेक्षणावर राणा यांची टीका

सी-व्होटरने इंडिया टुडेसाठी सर्वेक्षण केले. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळतील असा दावा यात करण्यात आला. या सर्वेक्षणावरती आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, 'सी वोटर कंपनी ही महाविकास आघाडीने तयार केलेली कंपनी आहे, जनतेची दिशाभूल करणारा हा सर्व्हे आहे,लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४८पैकी ४५ जागा शिंदे गट व भाजपाला मिळतील' असा दावा आमदार रवी राणा यांनी केला, तर 'बाळासाहेबांच्या विचाराची सेना ही भाजप सोबत आहे,तसेच उद्धव ठाकरे सरकारमध्ये अडीच वर्ष महाराष्ट्रात थांबला होता आता तोच महाराष्ट्र धावत आहे' अशीही प्रतिक्रिया राणा यांनी दिली.

Videos similaires