शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण केली होती. यावर बांगर यांनी प्रतिक्रिया देत महिलेला अशी वागणूक देणाऱ्याला तुडवायला पाहिजे, असं म्हटलं. तर महिला प्राध्यापकाशी गैरवर्तन करणाऱ्या प्राचार्यांना जाब विचारणं चुकीचं आहे का? असा उलट सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.