पंढरपूरच्या विठुराया चरणी रोज देशभरातील कित्येक भाविक नतमस्तक होत असतात. काही भाविक स्वखुशीने दानही देतात. मात्र जालना येथील एका भाविकाने तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचं गुप्त दान केलं आहे. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठुराया आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा साजरा केला जातो. यानिमित्ताने हे दान करण्यात आलं. यामध्ये सोन्याचा मुकुट तसेच रुक्मणी मातेला बांगड्या, मंगळसूत्र अशी आभूषणं देखील अर्पण करण्यात आली आहेत.