औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या पाचपीरवाडी गावात चोरट्यांनी मंदिरात ठेवलेल्या दानपेटीवर डल्ला मारला आहे. मात्र मंदिरात चोरी करण्यापूर्वी या चोरट्यांनी शंकराच्या पिंडीला नमस्कार केला. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली.