Laxman Jagtap यांच्या जागी कोणाला उमेदवारी मिळणार? महेश लांडगे म्हणाले...

2023-01-24 0

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाची उद्या भूमिका ठरणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दुपारी एक वाजता पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे बंधू शंकर जगताप ही उपस्थित असणार आहेत. या बैठकीत कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता असून बैठक संपताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पत्रकारांशी संवाद ही साधणार आहेत. चिंचवड विधानसभेबाबत भाजपाने पहिल्यांदाच भाष्य केलेलं आहे. याबाबत शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याशी संवाद साधला आहे कृष्णा पांचाळ यांनी..

Free Traffic Exchange

Videos similaires