शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची आज अधिकृत घोषणा झाली. प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबतच्या युती संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर अनेकदा ताशेरे ओढले होते. आता युतीनंतर शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील संबंध सुधारणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.