SS Rajamouli दिग्दर्शित RRR चित्रपटाचं कौतुक जागतिक स्तरावर होत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ओरिजनल साँगचा पुरस्कार मिळाला. तर चित्रपटाने बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मसाठी क्रिटिक्स चॉइस पुरस्कार देखील जिंकला. यावेळी प्रसिद्ध चित्रपट निर्माते जेम्स कॅमेरून यांनी RRR चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं.