गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी अनेकदा आपण नाराज नसल्याचं जाहीरपणे सांगितलही आहे. पण दुसरीकडे त्यांची वक्तव्ये मात्र त्या नाराजीची प्रचिती देत आहेत. मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचार सभेत बोलतांना त्यांनी पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. पण त्याचवेळी त्यांनी आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजीही केली.
#PankajaMunde #DevendraFadnavis #Beed #ChandrashekharBawankule #BJP #Shivsena #UddhavThackeray #AjitPawar #SanjayRaut #RamdasAthawale #TanajiSawant #ShambhurajDesai #MaharashtraKesari