महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी प्रवेश नाकारला आहे. शुभांगी पाटील यांनी थोरात यांना फोन करूनही प्रवेश नाकारला आहे. नाशिक पदवीधरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या संगमनेर दौऱ्यादरम्याचा हा प्रकार घडला आहे. शुभांगी पाटील या थोरातांच्या 'सुदर्शन' निवासस्थानाच्या गेटवरूनच माघारी फिरल्या आहेत.