Headlines: धनुष्यबाण कोणाचे? आज निवडणूक आयोगाची पुन्हा एकदा सुनावणी| Eknath Shinde| Uddhav Thackeray

2023-01-20 1

"शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचे यावर १७ जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. मात्र १७ जानेवारी रोजी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आपला युक्तीवाद केल्यानंतर सुनावणी २० जानेवारी रोजी पुढे ढकलण्यात आली होती. आज २० जानेवारी रोजी ही सुनावणी पुन्हा एकदा सुरु होईल.
दरम्यान, १७ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाने दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकूण घेतला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट पडलेलीच नाही. जी फूट पडल्याचं भासवलं जातं आहे कपोलकल्पित आहे असा दावा कपिल सिब्बल यांनी यावेळी केला. तसेच ही फूट ग्राह्य धरू नये आणि सर्वोच न्यायालयाचा निर्णय येईल पर्यंत कोणतही निर्णय घेऊ नये, अशी मागणी सिब्बल यांनी केली.

#eknathshinde #uddhavthackeray #shivsena #narendramodi #bharatjodo #sanjayraut #congress #maharashtra #hwnewsmarathi

Videos similaires