'कोणतीही निवडणूक आली तरी मोदींनाच धावपळ करावी लागते'; मोदींच्या दौऱ्यावर Supriya Sule यांचे विधान

2023-01-19 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. ते मुंबईत मेट्रो व इतर विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. त्यावर पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'मला मोदींची काळजी वाटते. पूर्वीच्या काळी भाजपाकडे एवढ्या मोठ्या नेत्यांची फळी होती पण आता कोणीच नाहीये. स्वतः मोदींना महापालिका ते देशाच्या निवडणुकांसाठी फिराव लागतंय. भाजपाला आज मोदींशिवाय पर्यायच नाही हे अगदी खरंय'