ना कुणाला स्पर्श करायचा, ना कोणावर सावली पडू द्यायची; आदिवासींमधील कुर्मा प्रथा काय आहे?

2023-01-17 12

समाजात असे काही विषय आहेत ज्याबाबत अजूनही खुलेपणाने चर्चा होत नाही आणि अनेक गैरसमजही आहेत. त्यापैकी एक विषय म्हणजे मासिक पाळी. प्रत्येक माणसाच्या जन्मासाठी मासिक पाळीचं चक्र अत्यंत गरजेचं असतं. असं असतानाही आजही मासिक पाळीमुळे स्त्रियांना समाजात भेदभावाला सामोरं जावं लागतं. शहरी, ग्रामीणच नाही, तर अगदी मातृप्रधान संस्कृतीचा प्रभाव असणाऱ्या आदिवासी समाजातही मासिक पाळीविषयी वेगवेगळे गैरसमज आहेत. आदिवासी समाजातील असाच एक गैरसमज आणि कुप्रथा म्हणजे कुर्मा प्रथा. ही कुर्मा प्रथा नेमकी काय आहे? त्याचा स्त्रियांवर नेमका काय परिणाम होतो? कुर्मा प्रथा आणि कुर्मा घर याबाबत काय मतप्रवाह आहेत? आणि कुर्मा प्रथेवर समाजात नेमकं काय काम होत आहे? हे समजून घेऊयात या व्हिडीओतून...