पुण्याच्या देवाच्या आळंदीतील धर्मांतरण प्रकरण चांगलंच चिघळले आहे. काही ख्रिश्चन धर्मीय हिंदू बांधवांच धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वारंवार समोर आले आहे. आळंदीत पोलिस ठाण्यात तसा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आता पुण्याच्या हिंदू महासंघाने उडी घेतली आहे. धर्मांतराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पंधरा दिवसात बेड्या न ठोकल्यास आळंदीसह महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा आनंद दवे यांनी दिला आहे.