बदलत्या हवामानामुळे कांद्याचे रोप खराब झाल्याने आता नवीन काहीतरी पीक घ्यावे या हेतूने नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसुल येथील गुलाब सोनवणे या शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रामध्ये कोबीचे पीक घेतले. मात्र, कोबी ज्यावेळेस निघण्यास सुरुवात झाला त्याला बाजारात एक रुपया गड्डा कवडीमोल भाव मिळू लागल्याने केलेला उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने संतप्त होत या शेतकऱ्याने दोन एकर उभ्या कोबी पिकावर रोटर फिरवला आहे.
#Nashik #Cabbage #Yeola #Farmer #Maharashtra #Rotavator #Tractor #ClimateChanging #Winter #Market #Vegetables #Field #Farming #Crops