'हे आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे ! जे बारामतीत जाऊन घड्याळ बंद पाडणार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या स्टेजवर त्यांच्या भाषणाचा आनंद लुटताना केंद्रीय मंत्री भागवत जी कराड व माननीय मंत्री श्री अतुलजी सावे' असे लिहून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाच्या एक कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केलाय. यात चंद्रशेखर बावनकुळे भाषण करत आहेत आणि स्टेजवरील मंत्र्यांना झोप अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे.