भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नव्या वर्षात नवे घोटाळे बाहेर काढणार, असा संकल्पच किरीट सोमय्या यांनी केला आहे. कारण नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी काही राजकीय नेत्यांची नावं जाहीरपणे सांगितली. यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागल इथल्या घरावर ईडीने धाड टाकली. पण त्यांनी आरोप केलेलं हे काही पहिलंच प्रकरण नाही. त्यामुळे हा केवळ योगायोग समजावा की अजून काही असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच एवढे घोटाळ्याचे आरोप करून सोमय्यांना भाजपकडून काय मिळालं असाही प्रश्न आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#KiritSomaiya #ED #UddhavThackeray #Matoshree #CBI #DevendraFadnavis #BJP #HasanMushrif #KishoriPednekar #NarayanRane #AslamShaikh #RashmiThackeray #Maharashtra