अजित पवार यांनी गोपीचंद पडळकरांवर उपटसुंभ म्हणत टीका केली होती, त्यावर "पहिल्यांदा लोक पवारांच्या विरोधात बोलायला घाबरायचे. पण लोक आता अजिबात घाबरत नाहीत. ते काही मोठे नाहीयेत, आपल्यामुळे ते मोठे झाले. घाबरु नका, मला पाठबळ द्या. होय मी आहे उपटसुंभ कारण मी राजकारणातून पवार घराणं उपटून टाकणार आहे" असे वक्तव्य पत्रकार परिषदेच्या वेळी गोपीचंद पडळकरांनी केले.