मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्यात सक्रिय झाल्याचं चित्र आहे. मात्र राज ठाकरे यांच्या पुण्यातील एका कार्यक्रमात फायर ब्रॅंड नेते वसंत मोरे यांना बसायला जागाच दिली नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोरे आणि मनसेमध्ये सर्व काही ठीक नसल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मनसेचे इतर पदाधिकारी बसून होते. पण एकाही पदाधिकाऱ्याने वसंत मोरे यांना बसायला जागा दिली नाही. त्यामुळे पुण्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागल्या आहेत.
#VasantMore #RajThackeray #MNS #Pune #SainathBabar #MNS #AshokSaraf #Shivsena #BMCElection #PuneMunicipalCorporation #Maharashtra