कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या सत्कार करण्यात आला. प्रेक्षकांच्या गर्दीमुळे नाट्यगृहात बसण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी नाट्यगृहात मागे भिंतीजवळ उभे राहून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. ही ‘राजनिष्ठा’ प्रेक्षकांच्या नरजेतूनही सुटली नाही.