२० ते २२ जानेवारी दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल अस वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं. त्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्यात. यावर शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट यांचं म्हणणं बरोबर आहे. मंत्री मंडळ विस्ताराबाबत एक घाव दोन तुकडे करून टाकायला हवेत. आता आमदारांमध्ये आता कुचबुज वाढली आहे. विस्तार नसेल करायचा तर स्पष्ट सांगावं, असं बच्चू कडू म्हणाले.
#BacchuKadu #EknathShinde #CabinetExpansion #DevendraFadnavis #BJP #MaharashtraCabinet #SanjayShirsat #Amravati #Politics #PraharJanshakti #Maharashtra