‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरन कायमच नवनवीन पाहुणे येत असतात. यंदाही प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे, निर्माते दिग्दर्शक परेश मोकाशी, अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी, शिवानी सुर्वेसह अनेक कलाकार आले होते. यावेळी भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, डॉ. निलेश साबळेसह चला हवा येऊ द्यातील सर्व हास्य कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना आणि तिथे आलेल्या पाहुण्यांना खळखळून हसवलं. त्यातच भाऊनं काळ्या मातीत मातीत गाण्याचं त्याचं अनोखं वर्जन गाऊन दाखवलं आणि उपस्थितांच्या डोळ्यात हसून हसून आनंदाश्रूच आणले