राज्याची उपराजधानी नागपुरात १०८ वी भारतीय विज्ञान काँग्रेस प्रदर्शन भरलं आहे. यावेळी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या भाषणात गावात पायाभूत सुविधा नसल्याचं सांगत सरकारवर टीका केली. त्यामुळे त्यांना भाषण आटोपतं घेण्यास भाग पाडल्याचा आरोप होतोय. आयोजकांना विचारलं असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं.