पिंपरी चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीची आठवण सांगितली. मी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी अर्ज भरून फोन बंद करायला सांगितले होते. त्यानंतर जगताप निवडून आले, अशी आठवण अजित पवार यांनी सांगितली. त्यांनी लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांची आज (५ डिसेंबर) सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
#Ajitpawar #LaxmanJagtap #Maharashtra #PimpriChinchvad #Pune #Assembly