बिबट्या मादीपासून लांब गेलेल्या पिल्लांची अखेर 'घरवापसी'; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
सांगलीमधील शिराळा तालुक्यात बांबवडे येथील उसाच्या फडात मातेपासून दुरावलेली बिबट्याची तीन पिले बुधवारी मध्यरात्री मादीने नैसर्गिक अधिवासात नेल्यानंतर पिलांची घरवापसी मोहीम यशस्वी पार पडली. आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या तीन पिलांना कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी वन विभागाने कडक पहारा ठेवला होता.
(लोकसत्ता प्रतिनिधी दिगंबर शिंदे)
.