छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीरपेक्षा स्वराज्य रक्षक ही बिरुदावली जास्त व्यापक ठरते, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॅा. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून याविषयी वाद सूरू असून अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया यावर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हेंनी टिकाकारांनाही सुनावलं आहे. राजकीय हेतून अकारण वाद न करता तर्कशुद्ध बुद्धीने याचा विचार करा, असं अमोल कोल्हे म्हणाले.