मकरसंक्रांतीनिमित्त पंतग उडविण्याला विशेष महत्त्व असल्याने त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात पतंग,मांजा खरेदी करायला ग्राहकांची गर्दी होत आहे. यावर्षी विविध तिरंगा, कार्टून, मोदी, हिरो नावाने ओळखल्या जाणारे पतंग बाजारात विक्रीस आले आहेत. मांजा, चक्रीसह मोठ्या आकाराच्या पतंगांना यावर्षी मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येते आहे.