विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 'छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते' असं वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा आता राजकीय पक्षातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याच संदर्भात नाशिक येथे भाजपाकडून निषेध आंदोलन करण्यात आले आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक होत पवारांवर टीका केली. त्या म्हणाल्या की, 'अजित पवार समाजातील वातावरण गढूळ करत आहेत. त्यांनी त्वरित माफी मागावी ही आमचीच नाही अशी महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे'