भाजपच्याच राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. पण या दौऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांचं या कार्यक्रम पत्रिकेवर नावच नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना भाजपकडून डावलण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.
#PankajaMunde #DevendraFadnavis #JPNadda #Beed #Politics #BJP #ChandrashekharBawankule #Aurangabad #BhagwatKarad #AtulSave #PritamMunde #Marathwada #Maharashtra