नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची भूमिका मांडली होती. यावेळी बोलताना, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असं ते म्हणाले होते. यावरून भाजपने अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून राज्यात ठिकठिकाणी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. पहा संजय गायकवाड काय म्हणाले.
#sanjaygaikwad #ajitpawar #bjp #wintersession #nagpur #adhiveshan #politics #chhatrapatisambhajimaharaj #history #ncp #shivsena #maharashtra #hwnewsmarathi