सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाचा दूसरा आठवडा सुरुय. पण अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधकांनी आपला मोर्चा थेट मंत्र्यांकडेच वळवल्याचं दिसतंय. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या विरोधकांच्या टार्गेटवर आता, शिंदे – फडणवीस सरकारमधील 4 प्रमुख मंत्री आलेत. या चारही मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप झालेत. विशेष म्हणजे एकाच वेळी 4-4 मंत्री घोटाळ्याच्या आरोपात अडकलेत. अब्दुल सत्तारांनंतर आता मंत्री संजय राठोड, उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शंभूराज देसाई यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत. त्यामुळे हे मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे.
#uddhavthackeray #eknathshinde #shivsena #abdulsattar #shambhurajdesai #udaysamant #sanjayrathod #bjp #devendrafadnavis #ncp #politics #mva #mahavikasaghadi #maharashtra #hwnewsmarathi