Anil Deshmukh Bail: तुरुंगातून बाहेर आल्यावर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (२८ डिसेंबर) तुरुंगाबाहेर माध्यमांशी बोलत होते.
अनिल देशमुख म्हणाले, “मला खोट्या आरोपात फसवण्यात आले आहे. परमबीर सिंह यांनी माझ्या १०० कोटी रुपयांचा खोटा आरोप लावला. मात्र, त्याच परमवीरने न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं की, मी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचे जे आरोप केले ते फक्त ऐकीव माहितीवर आधारित आहेत. माझ्याकडे त्याबाबत काहीही पुरावा नाही.”