राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येणार आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणीत त्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुखांची आज सुटका होत आहे. यांनतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरी केला जात आहे.