Sushant Singh: 'त्याच्या अंगावर मारल्याचे निशाण होते'; शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याचा खुलासा

2022-12-28 1,295

अभिनेता Sushant Singh Rajput मृत्यू प्रकरण अडीच वर्षांनी पुन्हा एकदा चर्चेत आलंय. या प्रकरणावरून राज्य सरकार आणि विरोधक पुन्हा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ कॉल आल्याचं लोकसभेत सांगितलं. ‘AU’ म्हणजे आदित्य ठाकरे, असा दावा राहुल शेवाळेंनी केल्याने एकच खळबळ उडाली होती. अशातच सुशांतच्या शवविच्छेदनावेळी हजर असलेल्या एका व्यक्तीने धक्कादायक दावा केला आहे. सुशांतने आत्महत्या केली नव्हती, तर त्याचा खून करण्यात आला होता, असं या व्यक्तीने म्हटलंय.

Videos similaires