नागपूरमधील महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या अनुपस्थित चर्चेशिवाय महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आलं. आता मुख्यमंत्रीदेखील लोकायुक्तांच्या कक्षेत असणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या विधेयकावर सरकारची बाजू मांडली.यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी लोकायुक्त विधेयक संमत करावा असा प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर ठेवला. यावर विधेयक क्रमांक ३६, महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२ मंजूर करण्यात आलं.