Winter Assembly Session: टाळ वाजवत, फुगडी घालत विरोधकांचे विधानभवन परिसरात सरकारविरोधात आंदोलन
राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या विधानसभेतील मागच्या आठवड्यात मोठा राडा झाला होता. या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवन परिसरात टाळ वाजवत सरकारविरोधात आंदोलन केले. 'कुणी खोके घ्या, कुणी गायरान घ्या' अशा पद्धतीने गोल फेर धरून आणि टाळ वाजवत विरोधकांनी राज्यसरकारविरोधात निदर्शने केली. यात अंबादास दानवे, यशोमती ठाकूर, रोहित पवार सहभागी झाले होते.