Girish Mahajan on CM Shinde: 'मुख्यमंत्री शिंदेही संघ मुख्यालयात येतील'; गिरीश महाजनांचे वक्तव्य

2022-12-27 74

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृति मंदिरात आज भाजपाच्या आमदारांचा संघपदाधिकाऱ्यांकडून अभ्यासवर्ग घेतला जात आहे. यावेळी त्याठिकाणी भाजपा नेते व मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता '२५ वर्ष आमच्या सोबत शिवसेना होती परंतु या ठिकाणी त्यांच्यामधील लोक येत नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इथे येतील कारण ते ही जुने स्वयंसेवक आहेत' असे वक्तव्य त्यांनी केली.

Videos similaires