नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी)ची सार्वजनिक वापराची जमीन खासगी वापरासाठी हस्तांतरित केल्याचे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा एक नवे जमिनीचा मुद्दा विरोधकांना मिळाला आहे . वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीन खासगी व्यक्तीला हस्तांतरित केल्या प्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात मविआने विधिमंडळच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी सत्तार,शिंदे यांच्याविरोधात 'भूखंड घ्या कुणी श्रीखंड घ्या' अशा घोषणाही देण्यात आल्या.