Tunisha Sharma Suicide :'शिझानला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे'; Tunisha Sharma आत्महत्या प्रकरणात तुनिषाच्या आईची मागणी

2022-12-26 2

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला गळफास घेत आत्महत्या केली आणि मनोरंजन क्षेत्राला पुन्हा एकदा धक्का बसला. तुनिषाच्या आत्महत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आता तुनिषाच्या आईने एका व्हिडीओमधून तुनिषाचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. शीजानचे यापूर्वीही अन्य मुलीशी संबंध होते. शीझानने आपल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दिशाभूल केली असे आरोप करताना शीजानला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही तुनिषाच्या आईने केली.

Videos similaires