राऊतांनी शिंदे गटातील आमदारांनी ५० कोटी रुपये घेतल्याचा पुरावा द्यावा : प्रताप जाधव

2022-12-24 26

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ५० खोके घेणाऱ्या आमदारांची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळातील येणाऱ्या १०० खोक्यांचीदेखील SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी करावी, असा खोचक सल्ला दिला आहे. शिंदे गटातील आमदारांनी ५० कोटी घेतल्याचा पुरावा असेल तर राऊतांनी तो सादर करावा, असे यावेळी खासदार जाधव म्हणाले आहेत.

Videos similaires